आशाताई बच्छाव
माहोरा येथे ह.भ.प.श्री रवींद्र महाराज महाले यांचे हरी कीर्तन संपन्न
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 07/04/2025
माहोरा येथे रेणुका माता कृपेने तीन वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. चैत्र शुद्ध नवमी दिनांक 6 रविवार रामनवमी च्या शुभ मुहूर्तावर आणि अखंड हरिनाम सप्ताहाची पहिले कीर्तन श्री रवींद्र महाराज महाले यांचे वाणीतून कीर्तन संपन्न झाले. त्यांनी आपल्या वाणीतून श्री रामचंद्राची महती सांगितली. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगीतले की भावार्थ हा एक गुण सर्व श्रेष्ठ आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे. त्याशिवाय नवीन पिढी चांगली निर्माण होणार नाही. भाऊ भाऊ, नवरा बायको, सासू सूना यांनी सुध्दा चांगले राहावे नाही तर आपणच वाईट वागलो तर मुलांवर सुध्दा तेच संस्कार पडतात. तसेच त्यांनी रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज यांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. महाराजांनी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी तसेच माऊली साऊंड सिस्टीम यांनी छान साथ दिल्या बद्दल आभार मानले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गावातील आणि परिसरातील महिला तसेच पुरुष मोठ्या प्रमाणावर हरी कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थीत होते.
तसेच ह.भ.प.पद्माकर महाराज वाघ यांनी अशीच उपस्थीती वाढवून पुढील कीर्तनाचा आणि काकडा , हरिपाठ,भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी पारायण या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.