आशाताई बच्छाव
सुझलाँन कंपनीच्या टाँवरचे फाऊंडेशन चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपूर पोलिसांची धडक कारवाई
(संदीप वसंतराव पाटील)
धुळे/नंदुरबार ब्युरो चीफ:-
साक्री तालुक्यातल्या निजामपूर पोलिस स्टेशन हद्दीतील फोफादे गावाच्या शिवारात सुझलाँन कंपनीच्या टाँवरचे फाऊंडेशन चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना मोठे यश आले आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फोफादे गावाच्या शिवारात सुझलाँन कंपनीचा टाँवर क्रमांक जे-०६ चे फाऊंडेशन टी-०१ सेल मधील लोखंडाची चोरी होत असल्याची माहिती निजामपूर पोलिसांना प्राप्त होताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरून चोरीचा माल, वाहन व मोबाईल फोन आणि चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.निजामपूर पोलिस स्टेशन येथे चोरट्याविरुद्ध गुरनं ००९०/२०२५ बीएनएस कलम ३०३(२),३(५) प्रमाणे आरोपी वसीमखान शेरखान,मनजीतसिंग सतनाम सिंग,राजबीरसिंग जसवंतसिंग,हरप्रीतसिंग बलविंदसिंग यांना अटक करून त्यांच्याकडून ६६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर वरील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून,या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी एस आर बांबळे, पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मयुर भामरे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, गायकवाड, प्रशांत ठाकूर, नारायण माळचे,रतन मोरे, प्रदिप आखाडे, खंडेराव पवार, सुनील अहिरे,सागर थाटसिंगारे, कृष्णा भिल, पृथ्वीराज शिंदे, गौतम अहिरे, प्रविण पवार आदींच्या तपास पथकाने व्यशस्वीरित्या गुन्ह्याचा तपास केला.