Home अमरावती अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड प्रकरणी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार चौकशी...

अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड प्रकरणी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार चौकशी करणार

32
0

आशाताई बच्छाव

1001380103.jpg

अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड प्रकरणी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार चौकशी करणार. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर. अमरावती. अमरावती येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर खोटी स्वाक्षरी करण्यात आली. हे पत्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पत्राबद्दल संशय आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पालकमंत्र्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी योगेश कोठेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गाडगे नगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास सुरू मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ला मिळालेल्या पत्रात वरुड नगरपालिकेतील एक वरिष्ठ लिपिकरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्रात नमूद केलेल्या नुसार या लिपिकाने वरिष्ठेच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका विभागात डेपो टेशन वर नेमणूक मिळाली होती. पत्रात लिपिका विरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत त्यात नागरिकांचे फोन न उचलणे आणि पत्रात लिपिका विरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत दादागिरी करणे याचा समावेश आहे तसेच नगरपालिका विभागातील निम्मे कर्मचारी गैरहजर असल्याची पत्रात नमूद करण्यात आले आहे याप्रकरणी पोलीस आयुक्त नवीन केंद्र यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. ह्या पत्रावर पालकमंत्री यांची बनावट स्वाक्षरीसह लेटर पॅड वर दिले असून ते टपालने पाठवले आहे ते पत्र जिल्हाधिकारी या यांनी ती पत्र तपासले असता त्यांना लेटरहेड व मंत्र्याची सही बनवत असल्याचे दिसून आले. याबाबत बनाव ट पत्रा बाबत व एचडी योगेश कोठेकर यांनी पोलिसात तक्रार अज्ञात आरोपी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here