
आशाताई बच्छाव
अंतरवाली टेंभी येथील शेतकरी महिलेचा खूनाचागुन्हा उघड खून करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकास घेतले ताब्यात.. स्थानिक गुन्हे शाखा व तिर्थपुरी पोलीस ठाणेची कारवाई
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 01/04/2025
सविस्तर वृत्त असे की दिनांक 25/03/2025 रोजी अंतरवाली टेंभी येथे नामे मीराबाई ऊर्फ संध्या राजाभाऊ बोडारे वय 41 वर्ष रा. अंतरवाली टेंभी ता. घनसावंगी जि. जालना हिला तिच्या शेतामध्ये तिच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता. त्यामूळे मयतचा भाऊ फिर्यादी अंकुश सदाशिव औटे वय 24 वर्ष रा. आपेगाव ता.पैठण जि. छञपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध तिर्थपूरी पोलीस ठाणे गू.र.क्र.42/2025 कलम 103(1) भा.न्या.स.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अज्ञात अरोपिताचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार व परिस्थिती जन्य पुराव्या आधारे एका 13 वर्ष 06 महीने वयाच्या विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगीतले की,विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी वारंवार अडवणूक करणे व विधिसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याचा राग मनात धरून दिनांक 25/03/2025 रोजी दुपारी 15.00 वाजेच्या सुमारास विधिसंघर्षग्रस्त बालकाने मयत महिला दुपारच्या वेळी तिच्या शेतामध्ये झोपलेले असतांना तिच्या डोक्यात दगड टाकून जीवे ठार मारले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री पंकज जाधव, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री साजिद अहेमद स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी.श्री.योगेश उबाळे,पोउपनि. श्री राजेन्द्र वाघ, मपोउपनि प्रतिभा पठाडे, तीर्थपूरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमालदार नारायण माळी व स्था.गु.शा.चे अंमलदार प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, आक्रुर धांडगे, इर्शाद पटेल, कैलास चेके, रमेश काळे, सौरभ मुळे, सर्व स्थागुशा. तिर्थपुरि पोलीस ठाणेचे होमगार्ड धनंजय पवार यांनी केली आहे.