
आशाताई बच्छाव
व्हाट्सअप स्टेटससाठी नवीन फिचर – आता थेट संगीत जोडता येणार!
नवी दिल्ली : WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फिचर्स आणत असतो. आता आणखी एक महत्त्वाचा बदल WhatsApp स्टेटससाठी करण्यात आला आहे. लवकरच युजर्स आपल्या WhatsApp स्टेटसला थेट संगीत (म्युझिक) जोडू शकणार आहेत.
आतापर्यंत स्टेटसवर फोटो, व्हिडीओ आणि मजकूर पोस्ट करता येत होता. मात्र, आता 24 तासांसाठी असलेल्या स्टेटसवर पार्श्वभूमीला आवडता संगीत ट्रॅक जोडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे फिचर मिळाल्यानंतर युजर्सना वेगळा अॅप किंवा एडिटिंगची गरज भासणार नाही.
व्हाट्सअपने हे फिचर बीटा टेस्टिंगसाठी काही युजर्ससाठी उपलब्ध करून दिले असून लवकरच सर्वांसाठी हे अपडेट जारी होईल. यामुळे WhatsApp स्टेटस अधिक आकर्षक आणि मनोरंजक होणार आहे.