आशाताई बच्छाव
मायंबा येथे लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मायंबा येथे मच्छिंद्रनाथाच्या समाधी उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. समाधीचे दर्शन घेण्यासाठी नाथभक्तांना आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेत या समाधीच्या दर्शनासाठी जावे लागते, ही या देवस्थानची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे.
वर्षभरात गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी सर्वांसाठी मच्छिंद्रनाथाची समाधी खुली करण्यात येते. सूर्य उगवणीच्या आत पाडव्याच्या दिवशी पहाटे पुन्हा समाधीचे दरवाजे बंद करण्यात येतात. दरवर्षी लाखो भाविक अवघ्या काही तासात या समाधीचे दर्शन घेतात. यावर्षी पाच लाखांहून अधिक भाविकांनी संजीवन समाधीचे दर्शन घेतले. राज्यासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा येथे येत असतात.