
आशाताई बच्छाव
कोसगावात शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर-डहाके
दिनांक 30/03/2025
भोकरदन तालुक्यातील कोसगावात गेल्या कित्येक दिवसापासून शासकीय कर्मचारी गावात मुख्यालय राहत नसल्याने गावातील अनेकांची कामे रखडत चालली आहे. शिक्षक, तलाठी ,ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक ,पशुवैद्यकीय कर्मचारी, वीज कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे परंतु यापैकी एकही कर्मचारी मुख्यालय राहत नाही याकडे संबंधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत प्रत्येक शासकीय कर्मचारी यांनी मुख्यालय राहण्याचा सरकारी नियम आहे परंतु या नियमाला खो देत आणि मुलांच्या क्षणाचे कारण देत परिसरातील शासकीय कर्मचारी कुणी तालुक्याच्या ठिकाणी तर कुणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावत आहेत सगळीकडेच शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाही मुख्यालयी राहण्याचे शासनाचे नियम आहेत. या नियमाची अंमलबजावणी करणारे वरिष्ठ अधिकारी मुख्यालय राहत नाही मग ते काय अंमलबजावणी करणार की असे की सर्वसामान्य नागरिक येत नसल्याने तासंतास त्यांची वाट बघत त्यांची ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे गावातील विविध खाजगी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढत आहे कोसगाव हे छोटेसे असून लोकसंख्या 3000 असून परंतु शासकीय कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने विविध शासकीय कार्यालयात त कामानिमित्त जावे लागते त्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यास कोसगाव या गावात मुख्यालयी राहण्याचे आदेश कोसगावातील सर्वसामान्य नागरिक गावातील सर्व पालकातून होत आहेत.