
आशाताई बच्छाव
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद
कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी विजय देवकाते वय ३४, रा.मदनवाडी, भिगवन, ता.इंदापूर, जि.पुणे असे ताब्यात घेतलेलया संशयीत आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी देवकाते याच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा असून तो राशीन ते भिगवन जाणाऱ्या रोडवर, करपडी फाटा, राशीन येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयीत आरोपी ताब्यात घेतला. गावठी कट्ट्याबाबत चौकशी केली असता ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे रा.जवळा, ता.जामखेडपसार यांच्याकडून गावठी कट्टा घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे.