Home बुलढाणा अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्या दुचाक्या, पळसखेड सपकाळ येथील घटना ; परिसरात...

अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्या दुचाक्या, पळसखेड सपकाळ येथील घटना ; परिसरात भीतीचे वातावरण…..

105

आशाताई बच्छाव

1001361496.jpg

अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्या दुचाक्या, पळसखेड सपकाळ येथील घटना ; परिसरात भीतीचे वातावरण…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा संजय ब्युरो चीफ पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दुचाक्या चाळल्याची घटना रविवारला रात्री दोन च्या सुमारास घडली आहे या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन अमडापुर येथे तक्रार दाखल करून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गाडी मालक संकेत ज्ञानेश्वर सपकाळ हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक MH28 BL2625 व राधेश्याम देवराव काळे हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्रमांक MH28 X3094 अशा या दोन दुचाकी पळसखेड सपकाळ येथे रविवार दिनांक २३/०३/२०२५ रोजी रात्री ०२:०० वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला आहे. या मध्ये दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुचाकी मालकांनी नेहमी प्रमाणे आपल्या घरासमोर दुचाकी उभ्या केलेली असताना रविवारला रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल दुचाकी जाळल्या. रात्री दोन वाजेच्या सुमारास शेजारची महिला घराबाहेर आली असता त्यांना दोन
दुचाकी जळत असताना दिसल्या व त्यांनी आरडाओरड करत गाडी मालकांना आवाज दिला की तुमच्या गाड्या जळत आहे दुचाकी मालक दोन्ही धावत पळत येऊन दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुचाकी मोठ्या प्रमाणात जळाल्या होत्या या घटनेमुळे पळसखेड सपकाळ परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलिस प्रशासनांनी या घटनेचे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्याची आवश्यकता आहे तसेच ग्रामपंचायत प्रशासनांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे पळसखेड सपकाळ येथील व परिसरातील नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

Previous articleबुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर……
Next articleमुजोर ग्रामविकास अधिकारी सवडतकर यांची बदली करा असोला बु ग्रामपंचायत सात सदस्यांची तक्रार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.