आशाताई बच्छाव
जिल्ह्याला शिस्त लावायला आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनीच मोडली शिस्त… कारवाई तर झालीच पाहिजे संतोष भुतेकर…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- चिखली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांच्या विरोधात संतोष भुतेकर यांनी…… विभागीय आयुक्त यांच्याकडे केली तक्रार. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी हे रिटायर झालेले आहेत असे असताना त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने कामावर घेतल्या जाते हे जरी खरे असले तरी 2016 च्या जीआर नुसार सदर कर्मचारी हे फक्त विवक्षित कामासाठीच घेतल्या जात असतात महत्त्वाचे किंवा गोपनीय कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप हा मुळीच असायला नको असे 2016 च्या जीआर मध्ये नमूद आहे असे असताना सुद्धा काही कर्मचारी मात्र कलेक्टर साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून सावलीसारखे त्यांच्यासोबत असतात… सदर
अधिकारांचे कंत्राटी पद्धतीने घेतलेले असल्यामुळे त्यांची हजेरी भूसंपादन विभागाच्या रजिस्टर वर दिसते म्हणजे ऑन रेकॉर्ड काम दाखवल्या जाते एका ठिकाणी व काम करतात एका ठिकाणी हे नेमके कशासाठी शिवाय जिल्हाधिकारी महोदय आता सध्या जी गाडी वापरतात ती प्रायव्हेट मालकीची असून शासनाने यांना दिलेली गाडी आहे तरी कुठे किंबहुना सदर गाडीवर किमान शासनाचा ड्रायव्हर तरी का नको शासनाकडून मिळालेली गाडी एम एच 28 65 99 ही आहे आणि वापरतात एम एच 28 50 33 जिच्यावर लॅम्प बसवण्याची परवानगी सुद्धा नाही हा सर्व प्रकार संशयास्पद व शासनाच्याच एका जबाबदार अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून कायद्याचे उल्लंघन करणारा व वरिष्ठांच्या डोळ्यात धुळ फेकणारा हा प्रकार आहे हे नियम बाह्य कर्मचारी ठेवण्यामागे जिल्हाधिकारी महोदयांचा दुसरा तिसरा कुठलाही हेतू नसून यामागे जिल्ह्यात चालू असलेल्या रेती सारख्या अनेक मोठमोठ्या रॅकेट मधून गडगंज माया जमवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी सर्व पुराव्यानिशी निवेदना च्या माध्यमातून सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्तांना केली आहे






