Home बुलढाणा दुर्दैवी BIG BREAKING! सुसाट पल्सर झाडावर आदळली; ३ तरुणांचा जागीच मृत्यू !...

दुर्दैवी BIG BREAKING! सुसाट पल्सर झाडावर आदळली; ३ तरुणांचा जागीच मृत्यू ! चिखली-जाफ्राबाद रोडवरील घटना

126

आशाताई बच्छाव

1001354842.jpg

दुर्दैवी BIG BREAKING! सुसाट पल्सर झाडावर आदळली; ३ तरुणांचा जागीच मृत्यू ! चिखली-जाफ्राबाद रोडवरील घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– चिखली आज, २५ मार्चला थोड्या वेळापूर्वी चिखली जाफ्राबाद रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली, यात दुचाकीस्वार ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पळसखेड दौलत गावाच्या समोर असलेल्या भोकरवाडीजवळ हा अपघात झाला…घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील राहणारे आहेत. रोहित महादू चाबूकस्वार (२४), शुभम रमेश चाबूकस्वार (२५), सोनू सुपडू उसरे (२३) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. एम एच १५, ०७५७क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे..