
आशाताई बच्छाव
टिटाणे फाट्यावर आबासाहेब स्व.राजू पाटील फाउंडेशनच्या वतीने पाणपोईचे लोकार्पण…. धुळे/ नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ
साक्री तालुक्यातील टिटाणे फाट्यावर नेहमीच प्रवास करणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. आंबेमोहोर,टिटाणे,पेटले, खोरी, जामदे अनेक गावांचे लोकं याठिकानाहून प्रवास करत असतात. त्याठिकाणी पाण्याची गरज व वाढता उन्हाळा लक्षात घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी या ठिकाणी *आबासाहेब स्व.राजू पाटील फाउंडेशनच्या* वतीने पाणपोई चालू करण्यात आली. मागील तीन वर्षापासून आबासाहेब स्व.राजु पाटील फाउंडेशनच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने पाणपोई तयार करून,काळ्या मातीचे माठ ठेवून पाणपोई लावण्यात येते . या पाणपोई साठी स्वतःच्या शेतातून निस्वार्थ भावनेने,सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पुढील काही दिवस पाणपोईसाठी मा.इंदिराताई डोंगर गावित यांनी पाणी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी आकाश देवरे,गिरीश दहिते,लकी ठाकरे ,सागर देवरे,अमोल दहिते, योगेश गावित,राजेश गावित,रूपेश गावित,तुषार गावित,नारायण गावित,दिग्विजय ठाकरे गावातील तरुण उपस्थित होते.