आशाताई बच्छाव
आलापुर शिवारात शॉर्टसर्किटमुळे अग्नी तांडव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 25/03/2025
भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर शिवारामध्ये सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानकपणे विद्युत तारा एकमेकांना घासल्यामुळे शॉर्टसर्किट झाले त्यांची ठिणगी खाली गवतात पडली आणि अचानक पेठ घेत जवळपास 22 ते 24 एकर शेतात यांचा 15 मिनिटात अग्नी तांडव झाला त्यात अनेक शेतकऱ्यांचे जुन्या मकाचे गंजी तर काही शेतकऱ्याची उभ्या असलेल्या लोकांना सुद्धा घेराव घेतला या परिसरात दोन-तीन शेतकरी शेतात मक्का सोबत असल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काही ना फोन केला तो पर्यंत मोठ्या प्रमाणात वर आगिने भडका घेतला होता. यादरम्यान या परिसरामध्ये गहू उभे होते तर काहीच्या मक्का त्याच बरोबर शेतकऱ्याने शेतात पांगवलेले ठिबक तुषार संच पाईप यासह शेती साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये जळून खाक झाले आहे.
तरी तहसिलदार साहेबांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना अर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.