आशाताई बच्छाव
काकणवाडा खुर्द साज्यातील पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास !
ग्राम महसूल अधिकारी सुषमा कांबळे यांच्या पुढाकाराने पांदन रस्ता मोकळा!
प्रतिनिधी | संग्रामपूर स्वप्नील देशमुख
मुख्यमंत्री गतिमान प्रशासन यांच्या शंभर दिवसीय कार्यक्रमानुसार पाणंद रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. याअंतर्गत, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर मंडळातील काकणवाडा खुर्द साजा अंतर्गत येणाऱ्या काकणवाडा खु. ते कोलद व काकनवाडा खु. ते माळेगाव असे दोन्ही बंद असलेले शेत रस्ते तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ मार्च रोजी मोकळे करण्यात आले.
यासाठी मंडळाधिकारी रवींद्र बोराखडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती सुषमा कांबळे उपस्थित होते. महसूल विभागाने पुढाकार घेत अतिक्रमण काढून दिलेल्या या दोन्ही रस्त्यांवर गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने लोकसहभागातून जेसीबी द्वारे दोन्ही रस्ते मोकळे करून रस्त्याचे निर्माण सुरू झाले आहे. मंडळ अधिकारी बोराखडे आणि ग्राम महसूल अधिकारी सुषमा कांबळे यांच्या उपस्थितीत पाणंद रस्त्याचे भूमिपूजन केले. यावेळी ग्रामसेवक बोडखे, गोपाल अढाव सरपंच काकणवाडा खुर्द, नंदु पाटील अढाव, उमेश आढाव, ज्ञानेश्वर अढाव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
# पांदन रस्ते मोकळे झाल्याने या दोन्ही रस्त्याच्या २५० हेक्टर जमिनीच्या १५० शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी यापुढे सोयीचे होणार आहे तसेच वाहने सुद्धा शेतापर्यंत नेता येतील.