आशाताई बच्छाव
रविवारी अकोला येथे भव्य वीरशैव वधु-वर परिचय मेळावा
वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव महिला मंडळाचे आवाहन
समाजबांधवांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा – डॉ. नितीन बिडवे
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ – वीरशैव लिंगायत समाज अकोला यांच्या पुढाकारातून व वीरशैव समाज महिला मंडळाच्या विशेष सहकार्यातून रविवार, २३ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता अकोला येथील सिव्हील लाईन स्थित जि.प. कर्मचारी भवनात भव्य वीरशैव वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील समाजबांधवांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष डॉ. नितीन बिडवे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जात प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावतीच्या सहाय्यक आयुक्त सौ. प्रिती केळकर तर उद्घाटक म्हणून मुर्तीजापूरचे आमदार हरिषआप्पा पिंपळे यांची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून अकोलाचे खा. अनुप धोत्रे, चिखलीचे माजी आ. राहुल बोंद्रे, विधानपरिषद आ. अमोल मिटकरी, पुर्व विधानसभा आ. रणधिर सावकर, अमरावतीचे माजी खा. अनंत गुढे, सुरेंद्रआप्पा हुंडीवाले शिरीष रामापुरे नागपूर यांची उपस्थिती राहील. या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विखुरलेल्या वीरशैव समाजाला एकत्र आणणे, पालक परिचय होणे, उपवधु-वर यांना परिचयासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश असल्याचे डॉ. नितीन बिडवे यांनी सांगीतले. तरी या मेळाव्याचा वीरशैव समाजबांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन मेळाव्याचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश मिसे, कार्याध्यक्ष मधुकर पांढरकर, उपाध्यक्ष रविंद्र कारंजकर, उपाध्यक्ष अतुल बिडवे, मुकुंद भुकण, डॉ. नितीन बिडवे, सचिव अविनाश मिटकरी, कोषाध्यक्ष गजेंद्र चिल्लरे, सहसचिव मंगेश डेहनकर, डॉ.प्रा. संतोष पस्तापुरे, सिद्धेश्वर दलाल, प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र मिटकरी, प्रविण रुईकर, नोंदणीप्रमुख बसवेश्वर डेहनकर, हरिओम माहुरे, महिला समितीच्या पदाधिकारी सौ. अर्चना मिटकरी, सौ. भावना कारंजकर, सौ. दिपा साल्पेकर, सौ. प्रिती मळेकर, सौ. नयना बिडवे, सौ. मिनल कापसे, सौ. भारती डेेहनकर, सौ. शिल्पा दलाल, सौ. स्मिता मिटकरी, सौ. नंदा बालटे, सौ. सुनिता गडकरी आदींनी केले आहे.