आशाताई बच्छाव
प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेलेल्या महंतांचे पारध नगरीत भव्य स्वागत व ग्राम प्रदक्षणा.
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पा रध बुद्रुक या गावी प्रयागराज येथे गेलेल्या महंता श्री दीपक महाराज योगीराज महाराज कृष्णगिरी महाराज महंत माई दौलतराम बाबा यांचे आगमन झाले नागरिकांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून गावातून गाव प्रदक्षिणा करण्यात आली यामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित यामध्ये महिलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून आली टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हर हर महादेव जयघोषाने पारध नगरी दुमदुमून गेली होती. गावातील मशीद जवळ येताच मुस्लिम बांधवांच्या वतीने महंतांचे स्वागत करून फुलांची उधळण करण्यात आली मुस्लिम बांधव या गाव प्रदक्षणा मिरवणुकीमध्ये सामील झाले होते गावातून प्रदक्षिणा होऊन त्याची सांगता येथील प्रसिद्ध देवस्थान श्री पाराशर ऋषी महाराज संस्थान या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या प्रसादाचा लाभ घेतला .