Home पुणे मूल होत नसल्याने दाम्पत्याने खरेदी केले बाळ, देहूरोड येथील गंभीर प्रकार, गुन्हा...

मूल होत नसल्याने दाम्पत्याने खरेदी केले बाळ, देहूरोड येथील गंभीर प्रकार, गुन्हा दाखल

124

आशाताई बच्छाव

1001286396.jpg

मूल होत नसल्याने दाम्पत्याने खरेदी केले बाळ, देहूरोड येथील गंभीर प्रकार, गुन्हा दाखल
याप्रकरणी बालकल्याण समिती -2 पुणे व सी. सी. डि.टी संस्थेच्या ॲड. सुरेखा कांबळे – पाटोळे यांच्या पुढाकारने पोलिसांनी पती-पत्नी आणि अन्य दोन संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला.
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
: स्वतःला मूल होत नसल्याने दाम्पत्याने गर्भवती महिलेला पैसे दिले. खोटे नाव सांगून तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दत्तक प्रक्रिया न करता तिच्याकडून बाळ घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथे 28 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नी आणि अन्य दोन संशयित महिलावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बालकल्याण समिती क्र. 2 पुणे यांनी दाखल घेऊन सी. सी. डी. टी. संस्थेच्या ॲड. सुरेखा कांबळे-पाटोळे यांनी शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
* पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याला मूल होत नाही म्हणून त्यांनी एका महिलेच्या ओळखीने गर्भवती महिलेला पैसे दिले. त्यानंतर तिला देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी गर्भवती महिलेची खरी ओळख लपवून तिला मूल होत नसलेल्या महिलेचे नाव दिले. त्यानंतर बालकाची खोटी माहिती जन्म नोंदणीच्या घोषणापत्रामध्ये दिली.
बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतीही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे बालकाची खोटी माहिती देऊन बालकाचा जन्माचा दाखला प्राप्त केला. कॅन्टोन्मेंट रुग्णालय प्रशासनाची फसवणूक करून बालक स्वतःचे आहे असे भासवून संबंधित महिलेला बाळाचे पैसे देऊन ते खरेदी करून स्वःच्या ताब्यात ठेवून घेतले, असे फिर्यादीत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous articleराष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज घुमणर कलारत्न महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
Next articleशनिमूर्तीवर ब्रँडेड तेलाचा श्रीगणेशा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.