Home जालना जीवनात अपयशाने कधीही खचून न जाता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा :

जीवनात अपयशाने कधीही खचून न जाता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा :

126

आशाताई बच्छाव

1001257635.jpg

जीवनात अपयशाने कधीही खचून न जाता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा :
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, दि. २०(प्रतिनिधी दिलीप बोंडे) –जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करणे
अत्यंत गरजेचे आहे. मेहनत केल्यास यश हे हमखास मिळते. तुमच्या
तारुण्याच्या या काळात चांगल्या मित्रांची संगत ही सुद्धा खूप महत्वाची
आहे, असे संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले.
जालना शहरात संभाजीनगर प्रभागात असलेल्या शांतिनिकेतन विद्यामंदिर या
शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना संस्थेचे अध्यक्ष तथा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,  जीवनात यशस्वी होऊन केवळ पैसा
मिळवणे हाच हेतू न ठेवता समाजाची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. यातूनच
चांगला व्यक्ती म्हणून तुमचे नाव लौकिक होईल व त्यातून तुमचे आई-वडिल,
शाळा व गुरुजन यांचे नाव मोठे होईल. अनेक यशस्वी झालेले विद्यार्थी
भेटतात तेव्हा त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. या स्पर्धेच्या युगात
कधी कधी जीवनात अपयश वाटयाला येते तेंव्हा खचून निराश होऊ नका तर त्यातून
नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दीपक
रणनवरे, माजी नगरसेवक विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निरोप
समारंभाचे या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून
आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास घायाळ
यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाच्या
मुख्याध्यापिका प्रेमला पंडित, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, शिक्षक
अंबादे आदी उपस्थित होते.

Previous articleअवैधरित्या वाळूची (गौण खनिजाची) चोरटी वाहतूक करणारे आरोपी 15,13,000/.रुपयाच्या मुद्देमालासह जेरबंद मौजपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
Next articleपीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांचीेफेरनिवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.