Home जालना महाराष्ट्र शासनाच्या गाव तिथे ग्रंथालय संकल्पनेतून पारध बु येथील युवकांचे उपविभागीय अधिकारी...

महाराष्ट्र शासनाच्या गाव तिथे ग्रंथालय संकल्पनेतून पारध बु येथील युवकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

143

आशाताई बच्छाव

1001253150.jpg

महाराष्ट्र शासनाच्या गाव तिथे ग्रंथालय संकल्पनेतून पारध बु येथील युवकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
दैनिक युवा मराठा तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे भोकरदन तालुक्यातील पारध बू हे गाव या गावाची लोकसंख्या दहा ते अकरा हजार परंतु या ठिकाणी शासनाच्या वतीने कोणतेही वाचनालय ग्रंथालय या ठिकाणी उपलब्ध नाही या या गावातील नवयुवक बाहेरगावी जाऊन अभ्यासिका मध्ये प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षा सारख्या कठीण असणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करतात गावांमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते असून या गावातील कोणत्याही कार्यकर्त्यांनी या नवयुवकांसाठी समोर येऊन या ग्रंथालयाला चालू करण्यासाठी वाचता फोडण्याचं काम सुद्धा केलेलं नाही या गावातील बरेचशे तरुण अभ्यासाला जागा उपलब्ध नसल्याने व पुस्तिके मिळत नसल्याने नोकरीच्या स्वप्ना पासून सध्या तरी कोसो दूर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक नवयुवकांना अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही अभ्यास करण्यासाठी एकांत जागा किंवा ग्रंथालय नाही पालकांचे सुद्धा स्वप्न असतात आपल्या मुलाने अभ्यास करावा त्याला नोकरी मिळावी या उद्देशाने त्याला अभ्यासिक मध्ये प्रवेश देतात भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक हे मोठं गाव असून या गावात अद्याप पर्यंत सुद्धा ग्रंथालय किंवा वाचनालय उपलब्ध झाले नाही या ठिकाणी या अगोदर शासकीय अथवा निमशासकीय ग्रंथालय दाखवून त्यांना मिळणारा निधीचा गैरवापर वापर केला असेल त्याची चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्यात यावे करिता सागर देशमुख गजेंद्र लोखंडे शिवाजी लोखंडे श्री जाधव व तसेच इतर तरुणांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.

Previous articleज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशी हभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन
Next articleनांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.