आशाताई बच्छाव
ग्राम संसद कार्यालय माहोरा येथे शिवजयंती साजरी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 19/02/2025
दिनांक 19 फेब्रुवारी बुधवार दिवशी सकाळी माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करुन आले.यावेळी सरपंच गजानन पाटील लहाने,उपसरपंच बाबासाहेब बोरसे, ग्रामविकास अधिकारी दांडगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य, ग्रा.प.कर्मचारी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन केले.