आशाताई बच्छाव
पोरी नाचवणारा नाही तर वाचवणारा माझा राजा छञपती शिवराय होता.. _. राष्ट्रीय व्याख्याते प्रा.कृष्णा पाटील इंगळे._
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक 19/02/2025
जाफराबाद तालुक्यातील मंगरूळ येथे शिवराजे मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिलीपजी भिसे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानात बोलताना राष्ट्रीय व्याख्याते प्रा. कृष्णा पाटील इंगळे( युद्ध भूमी आसई)म्हणाले की शिवजयंती हा उत्सव आपण विचारांची दिवाळी म्हणून साजरा करणे गरजेचे आहे. खरंतर आज समाजाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची आणि चरित्राचे पारायण करण्याची वेळ आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य रयतेला आपलं राज्य कसं वाटेल यासाठी काम केलं आणि म्हणून रयत फक्त सुखीच झाली नाही तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये रयतेमध्ये मरणासाठी स्पर्धा लागत होती ती छत्रपती शिवाजी महाराजांवर ची निष्ठा स्वराज्यातील मावळ्यांची कायम होती. याच अनुषंगाने पुढे बोलत असताना इंगळे मिळाले की आयुष्यामध्ये एकदा तरी माणसाने रायगड पहावा आणि तो त्या दृष्टीने पहावा त्या नजरेने पहावा याच ठिकाणी माझ्या राजाच 32 मन सोन्याचे सिंहासन सजलं होतं आणि महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक मायमाऊलीला वाटत होतं की या ठिकाणी जिजाऊ चा लेक राजा होत नाही तर तो सर्वसामान्य माय माऊलीचा लेक राजा होतो आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मंगरूळ डोलखेडा ग्रामपंचायतचे सरपंच विनोद राऊत. पोलीस पाटील देविदास गवते. दत्तू अण्णा मोरे. नितीन पाटील शिवणकर. ज्ञानेश्वर पाटील शिंदे. फारुख शेख. नशिंमखा पठाण. मराम डोके श्रीहरी डोके प्रल्हाद डोके. शिवराजे मित्र मंडळाचे प्रमुख श्री कृष्णा पाटील पवार. चेतन शिंदे. रामप्रसाद सुरासे. कृष्णा गाडे.बालीताई सुरासे. बाल शिवव्याख्याते शिवराज पाटील इंगळे. व्याख्याती गायत्री चव्हाण. त्यांच्यासह शिवराजे मित्र मंडळ मंगरूळचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील गवते यांनी केले.