Home पालघर फक्त पदाचा निरोप दिला आहे कर्तव्य चालूच राहणार उपसभापती प्रदीप वाघ यांचे...

फक्त पदाचा निरोप दिला आहे कर्तव्य चालूच राहणार उपसभापती प्रदीप वाघ यांचे भावनिक मनोगत कार्यकाळ संपल्याने पंचायत समिती कडून निरोप समारंभ

251

आशाताई बच्छाव

1001242305.jpg

फक्त पदाचा निरोप दिला आहे कर्तव्य चालूच राहणार

उपसभापती प्रदीप वाघ यांचे भावनिक मनोगत

कार्यकाळ संपल्याने पंचायत समिती कडून निरोप समारंभ

पालघर :सौरभ कामडी 
आज पंचायत समितीचा उपसभापती म्हणून कार्यकाळ संपतो आहे मात्र हा फक्त पदाचा कालावधी संपत आहे मात्र ज्या मुळे या पदावर होतो ती आपल्या लोकांची कामे करण्याचे कर्तव्य सुरूच राहणार आहे यामुळे अधिकार जरी संपले असतील मात्र कर्तव्य बजावत राहायचे आहे आज पहिल्यांदा काय बोलावे ते सुचत नसुन भावनिक झालो आहे. मात्र माझ्या आजवरच्या कार्यकाळात पंचायत समिती मोखाडा मधील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले. तसेच सरपंच उपसरपंच यांनी सुद्धा वेळोवेळी मदत केली यामुळे मी यशस्वीरीत्या हा कार्यकाळ पूर्ण करू शकतो असे भावनिक मनोगत माजी उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
जिल्हयातील पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्याने यासर्व सदस्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पंचायत समिती प्रशासनाकडून घेण्यात आला. यावेळी सभापती युवराज गिरंधले यांनी आपल्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत. पदावर असताना येथील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला मला सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी आभार देखील मानले यावेळी माजी उपसभापती लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील, आशा झुगरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती मधील सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होतेच या शिवाय शिक्षक समन्वय समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी एकात्मिक बालविकास अधिकारि, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक यांनी सहृदयी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सभापती युवराज गिरंधले यांच्या संकल्पनेतून पंचायत समितीच्या प्रथमदर्शनी भागावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच असा भव्य दिव्य निरोप समारंभ झाल्याचे बोलले जात आहे.

Previous articleभगीरथ राजा नगरात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी
Next articleखेळाडूंच्या हितासाठी लवकर निर्णय घेणार असल्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे बॉक्सिंग शिष्टमंडळाला आश्वासन…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.