Home जालना गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला...

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

69

आशाताई बच्छाव

1001230923.jpg

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) मुलं चोरुन नेणारा चोरटा म्हणून नागरिकांनी एका परप्रांतीयाला पोलिसाच्या स्वाधीन केलं होतं. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलं. त्यामुळे गोंदी सदरील मनोरुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मनोरुग्णाला नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. त्यामुळे मनोरुग्णाला कुटुंबीयांचा आधार मिळाला आहे.

मागील 18 महिन्यापासून ओरिसा येथून बेपत्ता असलेल्या मनोरुग्णाला गोंदी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्राच्या वतीने आज त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलय. विशेष म्हणजे लहान मुले पळवणारा व्यक्ती या अफवेतून शाहगड येथील  नागरिकांनी पकडून त्याला गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही व्यक्ती अखेर त्याच्या कुटुंबीयाकडे परत गेली आहे.
दोन दिवसापूर्वी शहागड येथील लहान मुलांना पळवणारा माणूस म्हणून तेथील नागरिकांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती ही मनोरुग्न असून ती ओडिसा येथील असल्याच समोर आल होत. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी ओरिसा येथील पोलिसांशी संपर्क साधला. ओरिसा येथील पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून दिल्यानंतर या मनोरुग्णाला जालना येथील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या निवारा केंद्रात असतानाही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Previous articleजालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर
Next articleनाशिकमध्ये संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.