आशाताई बच्छाव
जालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ
छाबडा हॉस्पीटल जालना, लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चेंट सिटी व रेड स्वस्तिक सोसायटी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 फेब्रुवारी 2025,रविवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत मधुमेह (डायबेटीज)निदान, चिकित्सा, उपचार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन छाबडा हॉस्पीटल मोदीखाना,संतोषवाडी समोर जालना येथे करण्यात आले आहे.
छाबडा हॉस्पीटलच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त सदरील शिबीर मोफत घेण्यात येणार आहे.
शिबीरात मधुमेह तज्ञ डॉ. धीरज छाबडा आणि डॉ. सौ तरुणा छाबड़ा रुग्णांची तपासणी करून निदान करतील. या शिबिरात रुग्णांची संपूर्ण शारिरीक तपासणी व उपचारा बाबत निर्णय, सिनेमा स्लाईडस द्वारे रुग्ण शिक्षण, प्रश्नांची उत्तरे व शंकाचे निरासन, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जालना शहरात 25 वर्षे आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेले छाबडा हॉस्पीटल जालना नेहमीच समाजकारणासाठी कटिबद्ध आहे.
रुग्णांनी येतांना उपाशी पोटी येणे आवश्यक आहे तसेच येतांना आपले सर्व जुने रिपोर्टस् सोबत आणावे. शिबीरासाठी नांव नोंदणी दि.13 ते 15 फेब्रुवारी 2025, शनिवारपर्यंत छाबडा हॉस्पीटल मोदीखाना, संतोषवाडी समोर येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. नाव नोंदणीसाठी फोन 02482-238567,02482-243200, मो. 9422345193 यावर संपर्क करावा. प्रथम येणार्या 100 रूग्णास प्राधान्य देण्यात येईल. तरी गरजूंनी त्वरित नांव नोंदणी करावी असे आवाहन जालना लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चट सिटीचे अध्यक्ष लॉ. पवन देशमुख, सचिव लॉ. आनंद वाघमारे, कोषाध्यक्ष लॉ. सुनिल भगत, रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र अग्रवाल, सचिव मोहन शिंदे, कोषाधयक्ष रमेश देहेडकर, डॉ. धीरज छाबडा व डॉ तरुणा छाबडा यांनी केले आहे.