Home बुलढाणा ब्रेकिंग ! बुलढाण्यात मोठा राजकीय भूकंप: – मुन्नाजी बेंडवाल, सुरेश सिनकर, नंदू...

ब्रेकिंग ! बुलढाण्यात मोठा राजकीय भूकंप: – मुन्नाजी बेंडवाल, सुरेश सिनकर, नंदू लवंगे यांच्या हातात ‘कमळ’

88

आशाताई बच्छाव

1001229147.jpg

ब्रेकिंग ! बुलढाण्यात मोठा राजकीय भूकंप: – मुन्नाजी बेंडवाल, सुरेश सिनकर, नंदू लवंगे यांच्या हातात ‘कमळ’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा शहरात आज राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. विविध पक्षांतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण घडामोडीत जि.प. सदस्य सुरेश सिनकर, माजी शिवसेना शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल, ऑल इंडिया मल्हार युवा संघटना अध्यक्ष नंदू लवंगे, नारायणजी हेलगे, विशालजी सोनुने, मिलिंद कुलकर्णी, निलेश आवडकर, शुभम सिनकर यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

प्रवेश सोहळ्याला भाजपा नेते डॉ. संजयजी कुटे, कामगार मंत्री ना. आकाशदादा फुंडकर, भाजपा बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्रजी गोडे, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ आणि इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. ना. बावनकुळे यांनी पक्षाचे रुमाल टाकून सर्वांचा पक्षात स्वागत करत
आगामी निवडणुकांसाठी या प्रवेशाचे महत्त्व अधोरेखित केले.

भाजपाच्या या आक्रमक पावलामुळे आगामी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात पक्षाचे बळ वाढणार असल्याचा विश्वास योगेंद्रजी गोडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्याने बुलढाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे दिसत आहे.

Previous articleब्रेकिंग ! मलकापूर रेल्वे स्टेशनवर थरकापः – युवकाचा आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार !
Next articleमुख्याध्यापिका सिमा वनकर यांनी गाठली लाचखोरीची परिसिमा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.