Home बुलढाणा EXCLUSIVE! परीक्षा केंद्र की हौसगृह? शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह ! परीक्षार्थीच्या भवितव्याशी...

EXCLUSIVE! परीक्षा केंद्र की हौसगृह? शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह ! परीक्षार्थीच्या भवितव्याशी खेळ? ‘बाटल्यांनी’ परीक्षा केंद्राचे वास्तव उघडे केले!

105

आशाताई बच्छाव

1001229128.jpg

EXCLUSIVE! परीक्षा केंद्र की हौसगृह? शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह ! परीक्षार्थीच्या भवितव्याशी खेळ? ‘बाटल्यांनी’ परीक्षा केंद्राचे वास्तव उघडे केले!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील बारावीच्या परीक्षा केंद्रावर झालेला प्रकार पाहता शिक्षण विभागाच्या कारभाराचा पुरता भंडाफोड झाला आहे.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्राच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आढळल्याने पालकांचा संताप अनावर झाला आहे. ही घटना केवळ परीक्षार्थीच्या भवितव्याशी खेळ करणाराच प्रकार नसून शिक्षण व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे ज्वलंत उदाहरण आहे परीक्षा
केंद्रावर पाण्याची आणि स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पालकांना असह्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. केंद्रावर मुलांचे हाल पाहून अनेक पालक संतप्त झाले असून या प्रकारामुळे परीक्षार्थीच्या मानसिकतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, पण प्रत्यक्षात मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध
नसल्याचे चित्र यंदाही समोर आले आहे. यावरुन केंद्र संचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
दारूच्या बाटल्यांचा प्रश्न हा केवळ परीक्षा केंद्राच्या सुरक्षेचा मुद्दा नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करतो. यामुळे या केंद्रावर परीक्षेपूर्वी कोणत्या प्रकारचे व्यवहार झाले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleदेगलूर महाविद्यालयात महिला आरोग्य व कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
Next articleब्रेकिंग ! मलकापूर रेल्वे स्टेशनवर थरकापः – युवकाचा आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.