आशाताई बच्छाव
मंठा येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त कुलदीप बोराडे मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 12/02/2025
मंठा शहरात खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचा वाढदिवस हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो त्याचेच औचित्य साधून आज दिनांक 11/0 2 /2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त कुलदीप बोऱ्हाडे मित्र मंडळाच्या वतीने मंठा शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. रावसाहेब महाराज खराबे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामप्रसाद बोराडे, शंकरराव गादेवाड, बाबुराव कव्हळे तसेच मंठा पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी उपस्थित राहुन रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्यांचे विशेष कौतुक करुन शुभेच्छा दिल्या .राक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आयोजक कुलदीप बोराडे यांनी यापुढे समाज उपयोगी उपक्रम रुग्णसेवेच्या उद्देशाने समाजभान जपत राबवणार असल्याचे बोलुन दाखवले. यावेळी श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना व योगेश्वरी सेवाभावी संस्था संचलित माजलगाव रक्तपेढी माजलगाव यांनी रक्त संकलन केले मंठा येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य पथक उपस्थित होते शिबीरात स्वयंस्फूर्तीने 40 रक्तदात्यानी रक्तदान केले. कुलदीप बोऱ्हाडे मित्र मंडळाच्या वतीने शिबिर आयोजित करण्याचे हे 6 वे वर्ष असून यापुढेही अव्यहातपणे दरवर्षी छत्रपती संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर यासह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. समाजामध्ये अनेक चांगल्या रूढी व परंपरा कायम ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अनेक प्रयत्न आपण करणार असल्याचे कुलदीप बोराडे यावेळी म्हणाले .आपण नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहणार असून समाजातील दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात सदैव पुढे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले