Home उतर महाराष्ट्र मुळा कारखान्यावर ऊसतोडणी कामगाराठी आरोग्य शिबिर 87 ऊस तोडणी कामगारांची तपासणी

मुळा कारखान्यावर ऊसतोडणी कामगाराठी आरोग्य शिबिर 87 ऊस तोडणी कामगारांची तपासणी

151

आशाताई बच्छाव

1001226177.jpg

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –मुळा कारखान्यावर ऊसतोडणी कामगाराठी आरोग्य शिबिर 87 ऊस तोडणी कामगारांची तपासणी . मुळा सहकारी साखर कारखान्यावर दिनांक ११/२/२५ रोजी कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये 87 ऊस तोडणी कामगारांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विधाटे यांनी सांगितले या शिबिराच्या आयोजन. मुळा कारखाना व सार्वजनिक आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शिबिरामध्ये ऊस तोडणी कामगाराची आरोग्य तपासणी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर संतोष विधाते यांनी आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेतली जावी याबाबत त्यांनी ऊस तोडणी कामगारा बरोबर चर्चा केली त्याचप्रमाणे डॉक्टर राजू बर्डे यांनी ऊस तोडणी कामगारांना क्षयरोग (टी.बी.) या आजाराबाबत माहिती देण्यात आली व या आजाराला कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे याबाबत त्यांनी माहिती दिली. व आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांचे त्यांनी चेकअप केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले साहेब यांनी आलेल्या सर्व आरोग्य विभागाचे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांचा कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी उपस्थित डॉक्टर संतोष विधाते वैद्यकीय अधिकारी सोनई, विनायक दरंदले सकाळ पेपर चे पत्रकार ,डॉक्टर सुनील वाघ समुदाय आरोग्य अधिकारी शिंगणापूर, डॉक्टर रमेश जावळे आरोग्य सहाय्यक सोनई, डॉक्टर राजू बर्डे क्षयरोग सुपरवायझर, डॉक्टर देविदास नवले आरोग्य सेवक शिंगणापूर, श्रीमती कविता ठोबंळ आरोग्य सेविका शिगणापूर, शेतकी अधिकारी विजय फाटके,मुळा कारखाना कामगार युनियन चे अध्यक्ष अशोकराव पवार सरचिटणीस डी एम निमसे , कार्यालयीन अधीक्षक योगेश घावटे, उपशेतकी अधिकारी चावरे साहेब , दत्ता पाटील सोनवणे, सुरसे मास्तर , लांडे एस के, कोंगे जीके, भगत वाय बी, संजय उणेचा , बन्सी दरंदले, विनोद सोनवणे, बबन दराडे,वाय के दंरदले,डॉक्टर डोईफोडे, व शेतकी स्टाफ व ऊस तोडणी कामगार यावेळी उपस्थित होते शेवटी दत्ता पाटील सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले .

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीच्या प्रदेश सरचिटणीस पदी गंगाधरराव भांगे यांचे नियुक्ती.
Next articleसेफर इंटरनेट डे – डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.