
आशाताई बच्छाव
जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन
परभणीत १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान महोत्सव
प्रतिनिधी:-शत्रुघ्न काकडे पाटील
-परभणी शहरात दि. 14 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत भव्य कृषि संजीवनी महोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव कृषि विभाग, प्रकल्प संचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी व संजिवणी मित्र मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाविद्यालय, क्रिडांगण, वसमत रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आत्मा चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण हे उपस्थित होते.महोत्सवामध्ये सहा दालन असुन एकुन 200 स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये, शेतकरी स्टॉल, सजिव नमुने, प्रात्यक्षिके, तसेच प्रमुख आर्कषन म्हणुन नाविन्य पुर्ण पशु, इ. चा समावेश असणार आहे. तसेच यामध्ये कृषि प्रदर्शने, कृषि विषयक परिसंवाद, यशस्वी शेतकरी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांची व्याख्याने तसेक उत्पादक ते ग्राहक थेट विक्री हि संकल्पना राबविण्यात येणार आहे.
आयोजनाचे उद्दिष्टयेः-कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे
शेतकरी – शास्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण.
समुह/गट संघटीत करुन स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे.
कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातुन विचारांच्या देवाणघेवाणीव्दारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातुन बाजारभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे.शेतकरी, कृषि बचत गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रीय शेतमाल उत्पादन तयार करणारे शेतकरी, कृषी प्रक्रीया करणारे उद्योजक, इत्यादींना या महोत्सवात 60 कृषि स्टॉल मोफत / विनाशुल्क देण्यात येणार आहे.
तसेच 100 स्टॉल हे बियाणे कंपन्या, खते कंपन्या, किटक नाशक कंपन्या, तण नियंत्रण कंपन्या, ठिबक / तुषार संच कंपन्या, प्रक्रीया करणारे कंपन्या व इतर कृषिशी निगडीत कंपन्या यांना सदरचे स्टॉल माफक दरात देण्यात येणार आहे. यासाठी अभिषेक घोडके, प्रकल्प उपसंचालक, आत्मा मो.नं. 9922516716 वर संपर्क साधावा.दालन–A – शासकीय योजना- 40 स्टॉल
B- कृषि निविष्ठा – 50 स्टॉल
C – शेतमाल,, धान्य महोत्सव दालन 32 स्टॉल
D – सेंद्रीय शेती माल, गृहपयोगी वस्तु – 32 स्टॉल
E – रोपवाटीका, ठिबक, तुषार सिंचन सेट 32 स्टॉल
D – अवजारे दालन -07 स्टॉल
E – पशुपक्षी दालन -07 स्टॉल
तसेच यामध्ये पशु प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.शेतकरी बांधवांना फुले, फळे, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य इत्यादीचे जीवंत नमुने प्रदर्शनात सादर करणेबाबत आवाहन करणेत येत आहे. तसेच सहभागी शेतकरी / पशुपालक यांचे मधुन पुरस्कार काढण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.