आशाताई बच्छाव
नासिक,( अँड विनया नागरे प्रतिनिधी )- जिल्हा न्यायालयामध्ये महिला वकिलांचे हळदी कुंकू खूप जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आले.दि.22/1/2025 रोजी नाशिक महिला विधीज्ञ समिती यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नासिक जिल्हा महिला विधीज्ञ समिती व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या व नाशिक जिल्हा महिला विधीज्ञ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संरक्षण कायद्याविषयी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये अँड शामला दीक्षित यांनी स्त्री शक्ती विधेयक कायद्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील सर्व महिला न्यायाधीश, महिला वकील, न्यायालीन महिला कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रम जिल्हा महिला विधीज्ञ समितीच्या सदस्या अँड सोनल कदम, अँड शामला दिक्षित, अँड श्रद्धा जोशी_ कुलकर्णी , अँड स्वप्ना राऊत, अँड सुप्रिया आमोदकर -देशपांडे ,अँड राणी रंधे -तळेकर, अँड प्रणिता जोशी -कुलकर्णी , अँड सोनल गायकर यांनी आयोजित केलेला होता. सदरचा कार्यक्रम महिला विधिज्ञ समितीकडून महिला वकिलांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सदैव आमची समिती तत्पर आहे असे आव्हान करण्यात आले व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात सदरचा कार्यक्रम पार पडला.