आशाताई बच्छाव
अनेक लोकांना चावा घेऊन जखमी केलेल्या कन्नड घाटातील पिसाळलेल्या माकडाला अखेर केले जेरबंद
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- कन्नड घाटात गेल्या अनेक महिन्यांपासून लाल तोंडाच्या एका माकडाने अनेक वाहन चालकांना लहान मुलांना स्त्रियांना चावा घेऊन जखमी केले होते
घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांवर अचानक हे माकड हल्ला करून त्यांना जखमी करत असत अनेक प्रवाशांनी वनविभागाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र हे माकड पकडण्यात आत्तापर्यंत यश मिळत नव्हते
दिनांक ११ जानेवारी रोजी वनविभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर शितल नगराळे तसेच वन्यजीव विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर रहाटवळ यांच्याकडे सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी या माकडाला पकडून इतरत्र हलवण्याची आग्रही मागणी केली होती.
आर. एफ. ओ शितल नगराळे मॅडम यांनी पाचोरा येथील पशुपक्षी मित्र अतिष चांगरे यांना बोलवून या माकडाचा बंदोबस्त करण्याचे सांगितल्याने अतिष चांगरे व त्यांचे चिरंजीव सुरज चांगरे यांनी वनविभाग सामाजिक व वन्यजीव चाळीसगाव यांच्या मदतीने या माकडास अत्यंत सीताफिने जाळीमध्ये जेरबंद केले आहे.
रेंज फॉरेस्ट ऑफिसर वन्यजीव विभाग श्री रहाटवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जाधव वनरक्षक विवेक सोनवणे तसेच वनमजूर लालचंद चव्हाण बापू आगोणे पृथ्वीराज चव्हाण सुभाष कुर्हाडे भिलू काळे गणेश राठोड यांच्या हवाली केल्याने या माकडास पिंजऱ्यात घालून इतरत्र सुरक्षित जंगलात रवाना करण्यासाठी हलविण्यात आले
सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी यावेळी या टिमला स्थानिक तरुण जीवन चव्हाण, मिथुन राठोड, प्रविण सोनवणे, रविंद्र अहिरे, याच्या सह पुर्णपणे सहकार्य केले
या माकडाला पकडून नेल्यानंतर या परिसरातील अनेक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर अनेक प्रवाशांनी वनविभागाचे धन्यवाद मानले.