आशाताई बच्छाव
पोषण आहाराच्या बारा मेनू ने वाढले शिक्षकांचे टेन्शन.
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 05/01/2025
देशभरातील मुलांना पोषक आणि दर्जेदार भोजन मिळावे यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत आठवडाभर विद्यार्थ्यांना पहिली फक्त खिचडी दिली जात होती.आता त्यात बदल करून विविध पाककृतींचा समावेश दररोजच्या आहारात केला आहे.हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला असला तरी शिक्षकांच्या डोक्याला ताप दायकच आहे कारण विद्यार्थ्यांना दर दिवशी दिल्या जाणाऱ्या बारा मेनूंचा हिशोब कसा ठेवायचा?असा प्रश्न शिक्षकांना सतावत असून त्या पोषणाचे लेखी काम व दररोज शिजवलेल्या मेनू ऑनलाईन मध्येच विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी बराच वेळ खर्च होत असल्याचे शिक्षक देवमन खुळे यांनी सांगितले.
………………………………………..
केंद्रातील सर्व शाळांनी दररोजच्या मेनू नुसारच आहार वाटप करावा अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या असून दररोजच्या खर्चाची बिले ही शिक्षण संचालक स्तरावरून दिली जाणार आहे.
डी के सोनुने – केंद्रप्रमुख माहोरा
…………………………………………..
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांचा रोजच्या आहारातला समावेश हा चांगला असला तरी शिक्षकांसाठी रेकॉर्ड ठेवायला मात्र किचकट असून बरेच पदार्थ हे बाजारातून मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीने स्वतः खर्च करून आणावयाचे व नंतर त्याची बिले सादर करायची असल्याने ही बाब खर्चिक व एक प्रकारची डोकेदुखीच आहे.
संदीप पोटे – शिक्षक माहोरा
————————————————–
आठवड्यातील पाककृती
दररोजच्या आहारामध्ये भाज्यांचा पुलाव, मसालेभात, मटर पुलाव ,मूग डाळ खिचडी ,चना पुलाव ,सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव,गोड खिचडी, मटकी उसळ, तांदुळाची खीर ,नाचणी सत्व ,मोड आलेले कडधान्य ,अंडा पुलाव या पदार्थाचा समावेश आहे.






