आशाताई बच्छाव
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित जलतरण स्पर्धेत बुलढाण्याच्या पिता-पुत्राने घडविला इतिहास
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 04/01/2025
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये बुलढाणा येथील विष्णूभगवान गाढे सहा. लेखाधिकारी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यासह त्यांचा मुलगा हर्ष विष्णूभगवान गाढे वर्ग 8वा सरस्वती विद्यालय बुलढाणा यांनी या जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यामध्ये हर्ष विष्णूभगवान गाढे याने मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील चिवला बीच येथे 03 किलोमीटर अंतर विहित वेळेत पोहून 53.23 या वेळेत पूर्ण केले. तसेच विष्णूभगवान गाढे सहाय्यक लेखा अधिकारी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुद्धा तीन किलोमीटर अंतर पोहून 34.55 या वेळेत पूर्ण केले आहे. ही स्पर्धा गाढे पिता-पुत्रांनी जिंकून एक इतिहास रचला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्या मधून उमटत आहे. मालवण येथील या जलतरण स्पर्धेत 05 वर्षे ते 70 वर्षे या वयोगटातील 1200 स्पर्धक सहभागी झाले होते.या विजयासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.