Home नांदेड स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

187

आशाताई बच्छाव

1001114176.jpg

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

मुखेड यूवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे

मुक्रमाबाद दि.०३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची 194 वी जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छ.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एम. जाधव तर प्रमुख वक्ते भूगोल विभाग प्रमुख डॉ. एम.एम. सय्यद होते. डॉ.सय्यद यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संतोष पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत महात्मा फुले यांचे असलेले योगदान याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.बी.बाविस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.आर.बी.मादळे यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी डॉ आर.एम.बिडवे,प्रा.संदीप गवते, डॉ.बी.पी.खराबे, श्री चंद्रकांत पाटील, प्रा.बस्वराज कपाळे, प्रा.जे.पी. काळे, डॉ सूर्यकांत सकनूरे, प्रा.ए.व्ही.शिंदे, डाॅ विलास पवार, डॉ.भिंगोले ई.व्ही.,बालाजी सादगिरे व पिंटू शिंदे व तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभंडारा तालुक्यातील दिघोरी( आमगाव) येथे धम्म सकाळ कार्यक्रमाचे 5 जानेवारीला आयोजन
Next articleसोनई महाविद्यालयात ” राष्ट्रीय गणित दिवस” साजरा…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.