Home बुलढाणा ब्रेकिंग – खेडेकरांचा “जय महाराष्ट्र” प्रतापराव जाधवांच्या गटात प्रवेश : उबाठा शिवसेनेला...

ब्रेकिंग – खेडेकरांचा “जय महाराष्ट्र” प्रतापराव जाधवांच्या गटात प्रवेश : उबाठा शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का !

103

आशाताई बच्छाव

1001106917.jpg

ब्रेकिंग – खेडेकरांचा “जय महाराष्ट्र” प्रतापराव जाधवांच्या गटात प्रवेश : उबाठा शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यात (उबाठा)
शिवसेनेच्या नेतृत्वाला मोठा हादरा बसला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकून नरेंद्र खेडेकरांना बुलढाणा लोकसभेची उमेदवारी दिली होती. खेडेकरांना 3,20,388 मते मिळाली होती, मात्र विजयाची संधी हुकली होती. विधानसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. फक्त उबाटा मतदारसंघातून एकच जागा निवडून आली.

आता या एकमेव गटालाही मोठा धक्का बसला आहे. चिखलीचे रहिवासी व शिवसेना (उबाटा गट) उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधवांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दुसऱ्या शिवसेनेत उडी घेतली आहे. या घटनेने जिल्ह्यात
खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

जिल्ह्यातील पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याच्या चर्चा सुरू असून, शिवसेनेतील अंतर्गत फूट चव्हाट्यावर येत आहे. कपिल खेडेकरांच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
उड्डाण घेतलेल्या “शिवबंधन” नाट्यावर हा नवीन वळण ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous articleवय वृद्ध कलावंतांची ऑफलाईन अर्ज तपासून निवड करा
Next articleब्रेकिंग ! नायलॉन मांजाला ढिल नाहीच! – प्लास्टिक पिशवी विक्री, साठवणूकीवर दंडात्मक कारवाई! आज नगरपालिकेने कुठे केली कारवाई?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.