Home बुलढाणा आपणा काम बनता भाड मे जाये जनता, चक्क इसरूळ बस स्टॉप वर...

आपणा काम बनता भाड मे जाये जनता, चक्क इसरूळ बस स्टॉप वर थांबलेल्या महसूल सेवकाला आपल्या रेतीच्या गाड्या जाऊ देत नाही म्हणून उचलून लोटपाट करत केले बाजूला महसूल सेवकाचाही आवाज बंद, रेती तस्करांना प्रशासनाचा आशीर्वाद :- संतोष भुतेकर

100

आशाताई बच्छाव

1001102407.jpg

आपणा काम बनता भाड मे जाये जनता, चक्क इसरूळ बस स्टॉप वर थांबलेल्या महसूल सेवकाला आपल्या रेतीच्या गाड्या जाऊ देत नाही म्हणून उचलून लोटपाट करत केले बाजूला महसूल सेवकाचाही आवाज बंद, रेती तस्करांना प्रशासनाचा आशीर्वाद :- संतोष भुतेकर
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली आणि देळगाव राजा सीमेवरील संत चोखामेळा धरणाची अवस्था अशी झाली आहे की वरिष्ठ अधिकारी यांनी आपापल्या परीने आपापला मेळ लावल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे त्यामुळे कारवाई करण्यास कोणीही दजावत नाही खडकपूर्णा धरणातील इसरूळ हे रेती माफियांचे प्रमुख ठिकाण असून सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसत नाही का भर दिवसा बोटी आणि अवैद्य वाढतो सुरू असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी हे याकडे कानाडोळा करतात जर यांना दिसत नसेल तर यांनी यांना असं म्हणावे लागेल की
दिसत नसल तर

माझ गांव माझा जिल्हा

णाप लागल फा

बोटी वाले आणि अवैद्य रेतीवातू करणारे सदर वरिष्ठ अधिकारी यांना रसद पुरवत असल्यामुळे यांचे हिम्मत यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची होत नाही असेच दिसून येत आहे अशी माहिती युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून महिन्यापासून खडक पूर्ण प्रकल्पामध्ये सातत्याने रेती उपसा बोटीद्वारे चालूच आहे अवैध रेतीच्या विरोधा मध्ये आंदोलन करुन आवाज सर्वसामान्य जनतेचे होणारे अपघात गेलेले जीव त्यातून प्रशासनाची होणारी बदनामी प्रशासनावर होणारे टीका विशेष म्हणजे युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार प्रशासनाची आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेली बदनामी या सर्व गोष्टी पाहता आतापर्यंत जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाने खडकपूर्णा प्रकल्पामध्ये चालू असलेल्या बोटी ह्या बंद करायला हव्या होत्या रीती उपसा थांबायला
हवा होता परंतु तो उपसा न थांबता सुरवातीला 20 ते 22 बोटीवरनं आता 55 ते 60 बोटीवर आकडा गेला आहे त्यामध्ये काही वसुली अधिकाऱ्यांच्य सुद्धा बोटी असल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर आली आहे धरणातली संख्या गेली एखाद्या शहरातल्या तालुक्याच्या ठिकाणी ऑटो पॉइंटवर ऑटोची जशी गर्दी लागावी तसंच बोटीचा स्टॉप धरणामध्ये झाला आहे एवढं सगळं खुलेआम चालू असताना धरणाचा मालक कुठे हरवला कुणालाच माहीत नाही परंतु त्या मालकाचा मालक असलेले जिल्हाधिकारी मात्र यांनी खरंच मनापासून जर ठरवलं असतं तर तहसीलदार किंवा खडक पूर्ण प्रकल्पाचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किंवा संबंधित ठाणेदार यांची मजालच नव्हती रेती चालू देण्याची आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठेतरी स्थानिक प्रशासनाच्या आर्थिक सहकार्य शिवाय हे रॅकेट चाललेच नाही आजही चालू आहे तर ते स्थानिक प्रमुखाच्या सहकार्याने चालू आहे कारण
अधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार आहेत की धरणामध्ये चालू असलेल्या बोटी कुणाच्या आहेत त्यांच्यावरती कारवाया करायच्या आतापर्यंत अशा ठोस कारवाया झाल्या नाही बोटी फोडल्या परंतु बोटीचे मालक मात्र शोधले नाही कुठल्याच पोलीस स्टेशनला एखाद्या अधिकाऱ्याने बोटीवाल्यांच्या विरोधात शोध घेण्या संदर्भा मध्ये एफ आय आर दाखल केला नाही हे सगळं खपवून घेतल्यामुळे आज रोजी परिस्थिती अतिशय विचित्र झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पक्की खबर मिळते की गेल्या दोन चार दिवसांपूर्वी काही रेतीवाल्यांनी चक्क तहसीलदारांसोबत बाचाबाची केली परंतु तरीसुद्धा तहसीलदार यांनी मात्र कुठलीही गुन्हा नोंदवण्याची हिंमत केली नाही त्याचीच प्रचिती म्हणून की काय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय झाला आहे एका रेती माफिया यांनी चक्क इसरूळ बस स्टॉप वर थांबलेल्या कोतवालाला आपल्या रेतीच्या
गाड्या जाऊ देत नाही. म्हणून उचलून लोटलाट करत रोडच्या बाजूला नेऊन ठेवले व आपल्या गाड्या काढून घेतल्या याबाबतीत कोतवालाने चक्क शब्दही काढला नाही तहसीलदाराला माहिती मिळाली असता त्यांनी सुद्धा सहन करा म्हणूनच समजून सांगितले या संदर्भामध्ये काही सूत्रांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना माहिती मिळाली असता जिल्हाधिकारी महोदय यांनी घटनास्थळ गाठून धरणाचा रेती उपसा स्थळांना भेटी दिल्या मात्र संबंधित तहसीलदार स्थानिक अधिकारी यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन असे काही चालूच नाही असे काही झालेच नाही अशा पद्धतीनेच आले तसे वाट लावले असे दिसते कारण जिल्हाधिकारी महोदय आले तर मग कुठली तरी कारवाई दिसायला हवी होती एखादा निर्णय घेणे अपेक्षित होते तसे काहीही झालेले नसल्यामुळे वाळूत मुतले फेस ना पाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे