Home बुलढाणा ब्रेकिंग – वाळू तस्कर ‘पुष्पा’ म्हणतात ‘हरगीज झूकेंगा नही साला!’ यंत्रणेने टाकली...

ब्रेकिंग – वाळू तस्कर ‘पुष्पा’ म्हणतात ‘हरगीज झूकेंगा नही साला!’ यंत्रणेने टाकली नांगी ? – बुलढाण्यात 20 ते 30 अवैध वाळू टिप्परांचा रात्री ‘खेळ चाले’! – आज 1 विना नंबरचा टिप्पर पकडला !

129

आशाताई बच्छाव

1001098851.jpg

ब्रेकिंग – वाळू तस्कर ‘पुष्पा’ म्हणतात ‘हरगीज झूकेंगा नही साला!’ यंत्रणेने टाकली नांगी ? – बुलढाण्यात 20 ते 30 अवैध वाळू टिप्परांचा रात्री ‘खेळ चाले’! – आज 1 विना नंबरचा टिप्पर पकडला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळगड
बुलढाणा :-बुलडाणा बांधकामासाठी रेतीचा वापर होतो. पण ही रेती नदीत मर्यादित स्वरुपात असते. त्यामुळे प्रशासन पर्यावरणाचा विचार करून रेतीच्या उत्खननास परवानगी देतो. परंतु काही जण अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करतात. असाच एक विना नंबर टिप्पर आज प्रभारी जिल्हाधिकारी शेलार यांनी पकडलाय. यापूर्वीही असे 2 टिप्पर महसूल विभागाने कारवाई केली होती. परंतु उपराउपरी कारवाई होणार
हे निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे. कारण वाळू तस्कर ‘पुष्पा’ आता पर्यंत झुकलेले नाहीत. बुलढाण्यात 20 ते 30 अवैध वाळू टिप्परांचा रात्री खेळ चालतोय ! यांना राजकीय अभय असल्याचे बोलल्या जात आहे.

कारवाई होऊन सुद्धा पुन्हा अवैध रेती वाहतूक महसुल व पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू राहते हे न उलगडणार कोड आहे?
बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याच रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. मराठवाडा विभागातून जाफराबाद तर देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीसह इतर नद्यांमधील
तालुक्याताल खडकपूणा नदासह इतर नद्यामघाल
रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना, मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याचे पाहायला मिळते. अवैध रेती वाहतूक करतानाचे टिप्पर सुसाट बुलढाण्यातून धावताहेत. एखाद्या टिप्परवर प्रशासन कारवाई करते. परंतु त्या पंचनाम्याच्या कार्यवाही मध्ये पळवटा असतात, असे अनेकदा समोर आले आहे. रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु असल्याने महसूल प्रशासनाचा यांना आशिर्वाद आहे का? हा प्रश्न असून, राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. रेती उपसा सुरु प्रकरणी दबावतंत्र की अर्थकारण आहे, हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे जिल्ह्यात चित्र दिसत आहे.

Previous articleकौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
Next articleब्रेकिंग – दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; दोघेही गंभीर जखमी ! शहर पोलिसांची तत्परताः अपघातस्थळी पोहोचून कारवाई सुरू !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.