
आशाताई बच्छाव
वयाच्या ३६ वर्षी नांदगावचे अष्टपैलू खेळाडू संजय लोने अनंतात विलिन
पालघर :सौरभ कामडी
दि.२९ पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील अष्टपैलू खेळाडू संजय लोणे यांच्या अल्पसाधारणे दुःखद निधन झाले. त्यांचे वय 36 वर्ष होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन मुले भाऊ.अशी होती. त्यांनी अखंडपणे सामाजिक कार्य, गोल्डन स्टार क्रिकेट क्लबचे नांदगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू होते. ते विवाहित होते. गोरगरीब जनतेच्या नेहमी मदतीला धावून जाणारे प्रसंगला धावून जाण्याच्या त्याच्या स्वभामुळे ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नासिक येथील शिर्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्राणजोत २८ रोजी संध्याकाळी मावळली. त्यांचे अंत्ययात्रेत सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदगाव येथील वैकुंठभूमीत त्याचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.