आशाताई बच्छाव
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे शनिदर्शन नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी अभिषेक पूजा करून शनिदेवाचे कुटुंबासह दर्शन घेतले.
त्यांनी मुंबई येथून स्वतंत्र खासगी विमानाने प्रवास करत शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर शानिशिंगणापुरात दाखल झाले होते. शेवगाव येथील उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दर्शनाने मनस्वी आनंद समाधान झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले,
मंत्री गोयल म्हणाले, भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाला लोकसभेच्या तुलनेत
विधानसभेला महाराष्ट्र राज्यात भरभरून स्पष्ट कौल दिला, त्याबद्दल तमाम जनतेचे आभार मानले. शेती निगडित असलेले उद्योगधंदे हा महत्त्वाचा घटक मानून केंद्रात भरीव तरतूद करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी दिवसभरात छत्तीसगड राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
पार्थ प्रीतम साहू यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य सदस्य अॅड. सपराम बनकर व बंजारवाडीचे पोलीस पाटील रमेश डोळे यांनी त्यांचे स्वागत केले,
शनिशिंगणापुर देवस्थानच्या वतीने कोषाध्यक्ष दीपक दरंदले, योगेश बानकर, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिराजदार, आदी उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयात त्यांनी आस्थेने चर्चा केली.
यावेळी ना. गोयल यांनी परिसराची माहिती जाणून घेतली. कृषी, वाणिज्य याबाबत सविस्तर चर्चा केली. देवस्थानचे काम पाहून समाधान व्यक्त केले. अधिक वेळ त्यांनी देवस्थान परिसरात घालविला. प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रपणे संवाद साधला.