Home जालना इंदलकरवाडी येथील न्यू पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद.

इंदलकरवाडी येथील न्यू पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद.

63

आशाताई बच्छाव

1001086498.jpg

इंदलकरवाडी येथील न्यू पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 26/12/2024
इंदलकरवाडी ता.जालना येथील न्यु पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल काढण्यात आली होती.
या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थानी या सहलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी किल्ला ( दौलताबाद किल्ला) विद्यार्थानी किल्ल्याच्या निर्मितीपासून ते शेवटच्या टोकापर्यंतची सर्व माहिती जाणून घेतली व त्याची वहित नोंद घेतली. प्राचीन गड, किल्ल्याची माहिती जाणून घेतली. तसेच वेरूळ ची कैलास लेणी पाहून विद्यार्थी भारावून गेले होते तसेच काही विद्यार्थानी विस रुपयाच्या नोटेवर असलेले चित्र हेच आहे असे देखील सांगितले. व त्यांना खूप आनंद वाटला खूप मोठे डोंगर कोरून लेण्या तयार केल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. तसेच यानंतर मुलांनी सिदार्थ गार्डन पाहिले व तेथील प्राणीसंग्रालय पाहिले तेथील वाघ , सिंह , हरीन , ससा , शहामूर्ग , माकड , मगर, बगळा , गिरगाय , सांबर , साळ, विविध जातीचे साप व इतर प्राणी पाहिले. व विद्यार्थी गार्डन मध्ये खूप खेळणे खेळले. व सहलीचा खूप आनंद घेतला.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.ढगे सर यांनी विद्यार्थाना सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली. यावेळी सहल प्रमुख श्री.बनसोडे सर , सौ.काटकर मॅडम , सौ. जैवल मॅडम, सौ. गाडेकर मॅडम , सौ.जगताप मॅडम, सौ.शेख मॅडम, व खरात मामा, अभिषेक, बळीराम आदी नी खूप परिश्रम घेतले.

Previous articleअजिंठा येथे बुलढाणा अर्बनच्या ग्राहकांसाठी 2025 ची दिनदर्शिका वितरण संपन्न
Next articleराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 27 डिसेंबरला रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.