Home नांदेड रस्त्याच्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी

रस्त्याच्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी

181

आशाताई बच्छाव

1001086422.jpg

रस्त्याच्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर – खासदार रवींद्र चव्हाण यांना देगलूर तालुक्यातील बल्लूर फाटा ते बल्लूर – गवंडगांव, शिवणी,पेंडपल्ली – झरी, माळेगांव (डावीकडे क्षीरसमुद्र – हाळी, बेंबरा तांडा) – मरतोळी, अंबूलगा, भूतनहिप्परगा, सोमुर- बेंबरा, मानूर, गो.गो तांडा, या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले. कै. वसंतराव चव्हाण यांनी मानूर येथील जाहीर सभेत निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य या रस्ताचा कामासाठी असेल असे जाहीरपणे जनतेस विश्वास दिले होते परंतू दुर्दैवाने ते आपल्यात नसून खासदार रवींद्र चव्हाण यांना त्याच्या शब्दाची आठवण करून देतं, त्यांनी दिलेल्या विश्वासास तडा न जाऊ देता या रस्ताच्या कामात प्रत्यक्ष स्वत लक्ष देऊन जलद गतीने मंजुरी आणून नवीन करून या सिमाभागास न्याय द्यावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.

बल्लूर ते मानूर हा रस्ता दुरुस्ती कामे प्रस्तावित व मंजूर कालवधीत होणे संबधित विभागाची जबाबदारी असताना तसे कार्य झाले नाहीत यामुळे विषयी नमूद रस्ताची दुरवस्था झाली आहे. हा सीमावृत्ती भाग आहे. रस्तालगतच्या सर्व गांवकऱ्यांनी विश्वास घेऊन सदरील रस्ताचे सक्षम काम जलद गतीने करून सार्थ करावे असे मत उपस्थित नागरिकांनी मांडले. यावेळी उपस्थित ऍड. अंकुशराजे जाधव, विशाल पवार, शिवकुमार बिरादार, सचिन पाटील, वैभव पाटील, श्रीराम पाटील, विष्णू रेड्डी, दीपक रेड्डी, राहुल फिरंगे, राजू वाघमारे, राजू वाघमारे, आदी संघर्ष समितीचे सहकारी उपस्थित होते

Previous articleभंडारा ते नीलज फाटा हायवे मार्गावर रस्त्याच्या बाजूला मुरम ऐवजी माती मिश्रित भिसचा वापर
Next articleसंजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांच्या 652 फाइल्स मंजूर; आजपर्यंत एकूण 2404 फाइल्स मंजूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.