Home नांदेड दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेचे वैभव कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणार...

दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेचे वैभव कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार रवींद्र चव्हाण

155

आशाताई बच्छाव

1001083923.jpg

दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेचे वैभव कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार रवींद्र चव्हाण

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

दक्षिण भारतातील व नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी माळेगाव यात्रेची आढावा बैठक नांदेडचे जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण व लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व अतिरिक्त पोलीस अधिकारी सुरज गुरव साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या आढावा बैठकीमध्ये विभागाचे सर्व अधिकारी प्रशासनातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. खा.रवींद्र चव्हाण यांनी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान देऊन त्यांचा सत्कार करावा.बारामती च्या धर्तीवर कृषी प्रदर्शनासाठीचालना द्यावी जिल्ह्यातील विविध लोककलेला प्रोत्साहन पर बक्षीस वितरित करावे आशा महत्वाच्या सूचना मांडल्या आरोग्याच्या सुविधा संदर्भामध्ये कुठलीच गैरसोय होणार नाही याची सक्त ताकीद यावेळी आरोग्य विभागाला दिल्या पोलीस प्रशासनाने महिलांच्या दागिन्याच्या चोरी संदर्भात जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी नवीन डिजिटल यंत्रणेचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा स्व.विलासराव विलासरावजी देशमुख यांचे योगदान महत्वाचे आहे .त्यांच्या स्मारकाबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिल्या.यात्रेला राजकीय रूप न देता यात्रा भाविक भक्तांची आहे आणि ती सुरळीत पार पाडावी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मान्यवरांचा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने व मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या आढावा बैठकीला माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब, माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे साहेब, जिल्हा परिषद माजी सभापती संजय आप्पा बेळगे, चंद्रसेन पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) संजय भोशीकर (माजी सदस्य जिल्हा परिषद),डॉ.धोंडगे साहेब (माजी सदस्य जिल्हा परिषद) बालाजीराव पांडागळे (तालुका अध्यक्ष कंधार) श्रीनिवास मोरे (मा.सदस्य जि. प.नांदेड)संजय पाटील कराळे (माजी सभापती),संदीप पाटील उमरेकर, आनंदरावजी गुंडिले (मा.अध्यक्ष जि.प. नांदेड) रंगनाथराव भुजबळ गुरुजी(मा.सदस्य जि.प.नांदेड)शरद पवार (तालुकाध्यक्ष लोहा) वसंतराव पवार, नितीन फासगे ,माळेगाव सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ जिल्हा परिषद च्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleवंचित बहुजन महिला आघाडी तर्फे स्त्री मुक्ती दिवस साजरा
Next articleउद्यापासून महाराष्ट्रातील “या” जिल्ह्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.