Home बुलढाणा नाशिकहून शेगावला जाणाऱ्या परिवाराच्या वाहनाचे टायर फुटले ! एक ठार ! तिघे...

नाशिकहून शेगावला जाणाऱ्या परिवाराच्या वाहनाचे टायर फुटले ! एक ठार ! तिघे जखमी ‘समृद्धी’ वरील दुर्घटना !

107

आशाताई बच्छाव

1001058746.jpg

नाशिकहून शेगावला जाणाऱ्या परिवाराच्या वाहनाचे टायर फुटले ! एक ठार ! तिघे जखमी ‘समृद्धी’ वरील दुर्घटना !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा नाशिक येथून शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या परिवाराची दर्शनाची मनोकामना अधुरीच राहिली! त्यांच्या भरवेगातील चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर हा विचित्र अपघात झाला.
नागपूर कॉरिडॉर वरील चॅनल क्रमांक २९१.६ नजीक
काल सोमवारी, १६ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. समृद्धी महामार्ग वरून नाशिक येथील खुळे पारिवार मारुती सुजूकी अल्टो (एम एच १५ ई एक्स ५१७४ क्रमाकाच्या) वाहनाने शेगाव येथे दर्शनाला जात होते. १६ डिसेंबर च्या रात्री उशिरा नागपूर कॅरिडोर चॅनेल नंबर २९१.६ या ठिकाणी वाहनाच्या उजव्या बाजूचे मागील टायर फुटल्याने भरधाव वेगाने जाणारे वाहन हे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बॅरिकेटला धडकले. यामध्ये वाहन चालक महेश खुळे (राहणार नाशिक) हे गंभीर तर त्यांच्याच परिवारातील सोबतचे ३ सदस्य जखमी झाले. यामध्ये शकुंतला खुळे (वय ६० वर्षे), दीपाली खुळे (वय ३८ वर्षे) आणि धनश्री खुळे (वय १८ वर्षे) यांचा समावेश आहे.

Previous articleडरना मना है!’ – पण.. ते कोण आहेत?
Next articleअनुश्री भगत हिचे यश  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.