आशाताई बच्छाव
शेगाव ( तिर्री ) येथे 12 डिसेंबर रोजी दुय्यम कव्वालीचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी नवयुवक मित्र मंडळ शेगाव ( तिर्री ) च्या सौजन्याने खास मंडई निमित्य सार्वजनिक मैदान येथे दि.12 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला रात्री 9 वाजता भंडारा येथील मराठी,हिंदी गीतांच्या सुप्रसिद्ध गायिका गुढिया दिक्षा आणि नागपूर येथील मराठी हिंदी गीतांचे सुप्रसिद्ध गायक संविधान कीर्ती यांच्या दुय्यम कव्वालीचा शानदार मुकाबला आयोजित करण्यात आला आहे.
दुय्यम कव्वाली मुकाबल्याचे उदघाटक म्हणून बाळूभाऊ फुलबांधे, सहउदघाटक किशोर पंचभाई,रेखाताई भुसारी तर उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शैलेश मयूर उपस्थित राहणार आहेत.ह्याप्रसंगी रंगमंचपूजक म्हणून आशिष माटे, भोजू वैद्य,पुजाताई हजारे,जितू इखार,मिलिंद धारगावे आदी मान्यवर उपस्थित राहतील.
दुय्यम कव्वाली मुकाबला पाहण्यासाठी परिसरातील जनतेनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन कमिटीचे अध्यक्ष जयपाल वकेकर,उपाध्यक्ष भगवान कुंभरे,सचिव पतीराम कळपते,सहसचिव सोपान वकेकर,संचालक वासुदेव धुर्वे,स्टेज मॅनेजर चंदू मडावी, राजकुमार कळपते त्याचप्रमाणे आयोजन मंडळाचे सदस्यगण यांनी केले आहे.