Home जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक पेन आणि एक वही अभियानास...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक पेन आणि एक वही अभियानास प्रतिसाद

58

आशाताई बच्छाव

1001026138.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक पेन आणि एक वही अभियानास प्रतिसाद.                                                         जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ 

डॉ. बाबासाहेंब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जालना शहरातील मस्तगड येथील डॉ. बााबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम) च्या वतीने गुरुवार दि. 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून एक पेन आणि एक वही या अभियानास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान या अभियानास नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या (फॅम) च्या वतीने एक वही आणि एक पेन अभियान राबविण्यासाठी विनोद फकीरा वाघ यांनी सकाळपासून स्टॉल लावला होता. दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. हे अभियान महाराष्ट्रात स्थापन होऊन 10 वर्ष पूर्ण झाले  असून मागील वर्षी जालना शाखेच्या वतीने नगर परिषद शाळा, टि. व्ही. सेंटर येथे वही आणि पेन वाटप करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात. ते दुसर्‍या दिवशी उपयोगाचे न राहता कचरा म्हणून वाया जाते. शिवाय भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध आहे असे स्वत: बाबासाहेब सांगून गेले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्याप्रमाणेच हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
आज भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे आवश्यक आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगाराचे विद्यार्थी शैक्षणिक सुविधा अभावी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत.

Previous articleबोरखेडी येथील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा समारोप
Next articleजिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.