आशाताई बच्छाव
बोरखेडी येथील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा समारोप
जालना, दि. ७(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-जालना तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीनलँड
इंग्लिश स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस ट्रेनिंग सेंटर जालनाचे
उपप्राचार्य विलास पाटील,ग्रीनलँड स्कूलच्या अध्यक्षा सारिका कटके, आतिश
देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले व शाळेचा झेंडा
फडकवल्यानंतर शांतीचे प्रतिक कबुतर सोडण्यात आले. स्पर्धेचे सुरुवात
करण्यात आली. प्रथम १०० मी धावण्याची स्पर्धा झाली. त्यानंतर नाणेफेक
करून कबड्डीचा अंतीम सामन्याचे सुरुवात केली. अंतिम सामना ग्रीनलँड
इंग्लिश स्कूल जिंकला व आर एम पी स्कूल द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
पंच म्हणून मुख्याध्यापक सुशीलकुमार गुढेकर हे होते. स्पर्धा
यशस्वीरित्या करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुशिलकुमार गुढेकर, संतोष
कांबळे,राजेंद्र जैवाल, अविनाश कांबळे, स्वप्निल शिंदे,शिक्षिका अश्विनी
कांबळे, पुष्पा राऊत, विजया उबाळे, अंबिका बन, पुजा कांबळे, कांचन
श्रीरामवार, मोनिका बिस्ट,रामभाऊ वाळुंज, रवी उगले, नितीन गोपने, रतन
मुळे मस्के,श्याम वाळुंज, लक्ष्मण गोपने, सोनू निळकंठ, आढे आदींनी
परिश्रम घेतले.
००००००००