Home जालना अन्न व प्रशासन विभागाचे जानून बुजून दुर्लक्ष. एका किराणा दुकानत कॅडबरीत अळ्या...

अन्न व प्रशासन विभागाचे जानून बुजून दुर्लक्ष. एका किराणा दुकानत कॅडबरीत अळ्या निघाल्या होत्या मागिल महिन्यातील घटना. अन्न व प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग.

153

आशाताई बच्छाव

1001026119.jpg

अन्न व प्रशासन विभागाचे जानून बुजून दुर्लक्ष.
एका किराणा दुकानत कॅडबरीत अळ्या निघाल्या होत्या मागिल महिन्यातील घटना. अन्न व प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग.
आता पुन्हा बिकानेर मधील पेढ्यात निघाल्या आळ्या परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात. 

अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 07/ 12/ 2024

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ही मुख्य बाजारपेठ असल्याने या गावांमध्ये 12/15 खेडयातून लोक येतात .पिंपळागाव रेणुकाई येथे दोन ते तीन बेकानेरची दुकाने आहेत. हे बिकानेर वाले सर्व माल बाहेरुन तयार करून ऑर्डरप्रमाणे व्यापार्‍याकडून रेडिमेट माल घेतात. तो माल केव्हा व कधी बनवलेला असतो हे काहीच महित नसते. याकडे अन्न व प्रशासन जानून बुजून दुलर्क्ष करीत आहे. काल रेलगाव येथील ग्राहकाने प्रसादासाठी पिंपळगाव रेणुकाई येथील बिकानेर मधुन पेडयाचे दोन तीन बॉक्स घेतले सकाळी आरती झाल्यावरती पेढ्याचा प्रसाद वाटण्यात आला. ज्यावेळेस प्रसाद तोंडात टाकण्यासाठी पेढ्याचे दोन भाग केले असता सकाळी सकाळी आरती साठी अलेल्या भक्तांना पेडया मध्ये आळ्या आढळून आल्या. हा पेढ्याचा प्रसाद जर का? खाल्ला असता तर फार मोठी दुर्घटना झाली असती. याला जबाबदार कोण बिकानेर वाले की अन्न प्रशासन. बिकानेर मध्ये अनेक व्यापारी आपला माल घेऊन येत असतात. पिंपळगाव रेणुकाई येथील बिकानेर मध्ये पेढ्या मध्ये आळ्या आढळून आल्याने संबंधित ग्राहकाने ज्यांच्याकडून पेडयाचे बॉक्स आणले होते त्या बिकानेर वाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या मार्फत बिकानेर मध्ये माल पुरवला जातो त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी ग्राहकांची मागणी असून अन्न व नागरी पुरवठा विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिकानेर मधील खाद्य पदार्थांच्या मालाचा स्टॉक चेक करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Previous articleपरळीत दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा हा खंडणीच्या उद्देशानेच – डॉ. बालाजी फड
Next articleबोरखेडी येथील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचा समारोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.