Home जालना राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र संघात अमृता सोपान शिंदे हिची निवड

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र संघात अमृता सोपान शिंदे हिची निवड

104

आशाताई बच्छाव

1000999930.jpg

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र
संघात अमृता सोपान शिंदे हिची निवड
बदनापूर, दि. २८(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- नुकताच २५ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत
जिल्हा क्रीडा संकुल बारामती, जि पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय
शालेय बेसबॉल स्पर्धा व निवड चाचणीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाची
अमृता सोपान शिंदे हिने उत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघात स्थान
पटकाविले आहे.
अमृताने यापूर्वी १४ वर्षे वयोगटात असतांना मध्यप्रदेश येथे मागील २०२३
-२४ मध्ये १७ वर्षे वयोगटात छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
होऊन उत्कृष्ट खेळी केली होती. या वर्षेही १९ वर्षे वयोगटात आपले स्थान
महाराष्ट्र संघात कायम ठेवले आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी
संजय गाढवे, जालना जिल्हा बेसबॉल असोशियशनचे अध्यक्ष निवृत्ती दिवटे,
सचिव एकनाथ सुरुशे, कोषाध्यक्ष प्रमोद खरात व पदाधिकारी यांच्यासह जिजाऊ
ज्युनिअर कॉलेज सेलगावचे अध्यक्ष गजानन वाळके,प्राचार्य पवार यांनी
अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
००००००००००
फोटो ओळी….
७- राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र संघात अमृता सोपान
शिंदे हिची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Previous articleराज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धेत जालना जिल्ह्या दुसर्‍या स्थानावर मोहीत मोरेची राज्य संघात निवड
Next articleउमलत्या वयाशी जुळवून घेताना स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले करणे गरजेचे-विशाखा वेलणकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.