Home जालना महाराष्ट्र राज्यात भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून...

महाराष्ट्र राज्यात भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

112

आशाताई बच्छाव

1000983560.jpg

 

महाराष्ट्र राज्यात भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रावसाहेब पाटील दानवे यांचे अभिनंदन

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला व महायुतीला मिळालेल्या यशामुळे जालना येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटक्याची आतिशबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

मिळालेले यश हे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्यात मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास वाढला आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे. विविध योजना आणून सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याने हा विजय मिळाला आहे. आजचा दणदणीत निकाल पक्षाच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाला प्राधान्य देऊन विकास कामांचे फळ आहे.

यावेळी विजय कामड, अर्जुन गेही, धनराज काबलीये, रविंद्र अग्रवाल, गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी, सुनील खरे, राजेंद्र भोसले,  अमोल कारंजेकर, सुभाष सले, राजू गवई, आनंद झारखंडे, बाबुराव भवर, तुलजेश चौधरी, प्रमोद गंडाळ, सुदर्शन काळे, सतीशचंद्र प्रभू, संतोष खंडेलवाल, सिद्धेश्वर हसबे, बद्री भसांडे, सेवक नारीयालवाले, उपस्थित होते.

Previous articleबीड जिल्ह्यातील विधानसभा २०२४ निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व कायम
Next articleरायगड  जिल्ह्यातील जुन्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास कायम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.