Yuva maratha news
नेवाशात मतदार राजांचा उत्साह शिगेला
सर्वत्र लांबच लांब रांगा; रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू
सोनई, ता. २० : नेवासे विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील १३४ गाव व वाड्यावस्त्यांवरील २७६ मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सुरु झालेली गर्दी रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होती. सोनई, नेवासे, कुकाणे, घोडेगाव, करजगाव, शिरसगाव या मोठ्या गावात लोकशाहीचा महोत्सव गर्दीच्या स्वरूपात पाहण्यास मिळाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत टक्केवारीने सत्तरी ओलांडली असून सायंकाळी सहानंतर केंद्राच्या आवारात मोठ्या रांगा असल्याने विक्रमी मतदान होईल असा अंदाज आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी सोनई येथील शनिश्वर विद्यालयात मतदान केले. तर शिवसेना शिदि गटाचे उमेदवार विठ्ठल लंघे यांनी शिरसगाव जिल्हा परिषद शाळेत व प्रहार जनशक्तीचे उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव
जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रात मतदान केले. नेवासे, सोनई व कुकाण्यात नव मतदारांचा उत्साह पाहण्यास मिळाला. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने अनेक युक्क, युवतीचा हिरमोड झाला. सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत मतदारास दोन ते
सायंकाळो पाच वाजता तालुक्यातील पंचायत समिती गण व मतदानाची टक्केवारी याप्रमाणे -सोनई (७५.४९), घोडेगाव (७४.२२), चांदे (६९.३८), देडगाव (७२.११), खरवंडी (६९.३८), करजगाव
(७०.२१), भानसहिवरे (७०.३८) पाचेगाव (६९.५२), बेलपिंपळगाव ( ७२.५६) सलाबतपूर (७५.१७) कुकाणे (५८.९६), शिरसगाच (७५.१८), पेंडे (६२.९२), मुकिंदपू (७०.६५), नेवासे नगरपंचायत (६३.१८). सायंकाळी पाच वाजता तालुक्यात दोन लाख ८३ हजार १११ पैकी एक लाख ९९ हजार ८८६ ७०.६०टक्के) मतदान झाले होते.
पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासेचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी व शनिशिंगणापुरचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर तसेच केंद्रीय राखीव दलाचे पोलीस दिवसभर सतक राहिल्याने कुठेही वाद अथवा गोंधळ झाला नाही. मतदानाचा उत्साह व गणात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसा कार्यकत्यांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.